यत्र नार्यस्तु पूज्यन्ते-1

गडगंज श्रीमंत असलेल्या त्या मुलाने दोन खोलीत राहणाऱ्या आपल्याला का पसंत केलं हा प्रश्न तिला सतावू लागला,

तिचं आयुष्य म्हणजे एक संघर्षच,

आई नव्हती,

घरी वडील आणि लहान भाऊ, दोघांना सांभाळायची जबाबदारी तिची,

घरातलं आवरून, भावाला कॉलेजमध्ये सोडून ती नोकरीवर जाई,

घरी आली की छोटी मोठी बाहेरची कामंही करी,

स्वतःचं असं काही नव्हतंच तिच्या आयुष्यात,

छोट्याश्या चाळीत राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाला शेजारच्यांची चांगली मदत होई,

असंच एकदा शेजारचे आजोबा तिच्यासाठी एक स्थळ घेऊन आले,

आपलं कुटुंब सोडून स्वतःचा संसार करायचा तिला मान्यच नव्हतं,

भावाला सेटल होऊदेत मग बघू असं ती म्हणायची,

पण वडील काही ऐकेना, त्यांचं वय होत होतं..

शरीर खचत चाललं होतं,

रिटायर झाल्यानंतर पेन्शनवर बऱ्यापैकी घर चाले,

त्यांनी विचार केला,

आपल्याच मुलीच्या वाट्याला संघर्ष का? तिनेही संसाराची स्वप्न पहिली असतील, तिलाही सुखी जीवन जगण्याचा अधिकार आहे..

विशेष म्हणजे जे स्थळ आलं होतं तो मुलगा एकुलता एक, आई नाही, घरी फक्त वडील आणि तो..

त्याचे वडील अंथरुणाला खिळलेले, पण त्यांचा बिझनेस त्यांचा मुलगा पाहायचा,

करोडो मध्ये संपत्ती होती त्यांची,
*****

427 thoughts on “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते-1”

Leave a Comment